उर्मिला मातोंडकर अॅक्टिंगपेक्षा सॉफ्ट पॉर्नसाठी जास्त परिचित ; कंगनाची जीभ घसरली

प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची हीन भाषेतील टीका अभिनेत्री कंगना रनौत हिने केली आहे. कंगनाने तोंडसुख घेतल्यानंतर मनोरंजन विश्वातून उर्मिला मातोंडकर यांची पाठराखण केली जात आहे.

“उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” असं कंगनाने  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमान केल्याचा दावाही कंगनाने केला.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.