‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निर्बंध घाला’

देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच लोकसभेत 311 मतांनी ते मंजूर कऱण्यात आलं. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी या आयोगाने केली आहे.

अमेरिकेच्या USCIRF आयोगाने म्हटलं की, नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास अमेरिकेने अमित शहा आणि इतर प्रमुख नेत्यांवर निर्बंध घालावेत.

दरम्यान, या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आसाममध्ये निदर्शने केली जात आहेत. विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवताना अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. आसाममध्ये या विधेयकाच्या विरोधात 12 तासांचा बंदही पुकारण्यात आला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.