‘लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही’; पवारांचा युजीसीवर निशाणा

मुंबई : केंद्राने 18 वर्षांवरील सर्वांच्या मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची युजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल,” असं म्हणत रोहित पवार यांनी युजीसीवर टीका केली.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देतानाच हे फलक समाजमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यास सांगितलं आहे.

या चित्रामध्ये ‘धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं लिहिलं आहे. दरम्यान, यूजीसीच्या या सूचनेवरून शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेक विद्यार्थी संघटनेनं याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा