InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार होते, मात्र…

2002 च्या गुजरात दंगलीनंतर तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवणार होते. गोव्यातील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अटलजींनी हे निश्चित केले होते की, जर मोदींनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदावरून हटवले जाईल. असेही बैठकीत निश्चित करण्यात आले होते.

मात्र अडवाणी यांनी या निर्णयाला विरोध करत, मोदींना हटवले तर मी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देईन, अशी धमकी दिली होती., असा गौप्यस्फोट भाजपमधील बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ते भोपाळ येथील कार्यक्रमात बोलत होते.

अडवाणी यांच्या विरोधामुळेच मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी राहिले, असे सिन्हा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply