Vajramuth Sabha | मविआमध्ये वज्रमुठ सभांसाठी पुन्हा हालचाली सुरू, पुण्यात कधी होणार सभा?

Vajramuth Sabha | पुणे: महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. यासाठी पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट कामाला लागले आहे. शरद पवारांचा राजीनामा आणि उन्हाचं कारण देत या सभा पुढे ढकलल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात करण्यात आलं होतं. आता येत्या दोन दिवसात सभेच्या पुढील तारखा निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरानंतर पुण्यामध्ये 14 मे रोजी वज्रमुठ (Vajramuth Sabha) होणार होती. मात्र, त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. शरद पवारानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनीही राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर वज्रमुठ सभा रद्द झाल्या असल्याचं बोललं गेलं होतं.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे अनेकांचे जीव गेले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच पेटलं होतं. त्यामुळे उन्हाचं कारण देत या सभा (Vajramuth Sabha) रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, आता जून महिन्यात या सभांचं आयोजन करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपासून या निवडणुका जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. परंतु, या निवडणुका कधी होणार? याबाबत माहिती मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर 9 जूनला महाविकास आघाडीकडून एकत्रित मोर्चा काढला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41W5Vce

You might also like

Comments are closed.