व्हॅलेंटाईन डे २०२० : प्रेम व्यक्त करताय ? जरा जपून !

आज ७ फेब्रुवारी , व्हॅलेन्टाईन्स-डे वीक आजपासून सुरू होत आहे.सर्व तरुणाईचा आवडता दिवस आजपासून चालू होत आहेत. कॉलेजेस किंवा इतर ठिकाणी प्रत्येकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला फुल , चॉकलेट्स , गिफ्ट्स देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. आजच्या २१व्य शतकात मोबाईलमुळे , सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करणे सोप्पे झाले आहे. जोडीदार निवडण्यासाठी मॅट्रिमोनिअल , किंवा डेटिंग अप्स देखील आले आहेत. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजूला असतात तसेच प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशी बाजू असते. याच सोशल मीडिया किंवा डेटिंग अँपचा  आपल्याला जसा फायदा होतो तसेच तोटा देखील होऊ शकतो.

 

आयुष्यात एकदाच  प्रेम होते आणि लग्नदेखील एकदाच होते हि संकल्पना आजच्या तरुणाईने मोडीतच काढली आहे.मोठं मोठ्या शहरात ऑफिसमध्ये , कॉलेजात, सोशल मीडियावर किंवा डेटिंग अप्सवर अनेक जण एकमेकांचे मित्र-मैत्रिणी बनतात. गप्पा वाढू लागतात आणि भेटी होऊ लागतात. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर दोघेजण एकमेकांना ‘डेट’  करायला सुरु करतात.

व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे काय? ‘व्हॅलेंटाईन डे’ का साजरा केला जातो?

पण डेटिंग म्हणजे काय हे त्यापैकी किती जणांना माहिती असते? डेटिंगची नक्की संकल्पना काय आहे? डेटिंग म्हणजे जिथं दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, एकमेकांना समजून घेतात, आधी भावनिक आणि नंतर मग शारीरिकरित्या जवळ येणे..आजच्या तरुणाईच्या भाषेत यालाच कदाचित डेटिंग म्हणत असावेत.चुकीच्या समजुती आणि सांस्कृतिक परिस्थिती यामुळे डेटिंग नाजूक विषय बनला आहे आणि लहान गावामध्ये ,छोट्या शहरांमध्ये तर खूपच गंभीर…

 

जालनामधील हल्लीच घडलेली घटना.. एक प्रेमी युगुल एकेमकांसोबत वेळ घालवत असताना गावातले काही गुंड येऊन त्यांनी या युगुलाला मारहाण केली आणि तरुणीचा विनयभंग केला. या सर्व प्रकारामुळे आजकाल तरुण तरुणीचे एकमेकाना भेटणे देखील कितपत  घातक ठरू शकते हे लक्षात आले असेलच.

बजेट २०२० : आधारकार्ड असेल तर लगेच मिळणार पॅनकार्ड !

त्यामुळे या व्हॅलेन्टाईन्स डे च्या वीक मध्ये जर डेट करत असाल तर काही गोष्टींचे जरूर पालन करा..तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे, याबाबत जागरूक राहा. ज्या भागात कथित संस्कृतीरक्षकांच्या टोळ्या असतील, विशेषत वॅलेंटाईन डेला असे कथित संस्कृतीरक्षक जास्त लक्ष ठेवून असतात, अशा ठिकाणी जाणं टाळा. योग्यप्रकारे भेटा, विशेषकरून  सार्वजनिक ठिकाणी भेटा ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागणार नाही. आणि तुम्हाला एकेमकांनसोबत व्यवस्थित वेळ घालवता येईल. 

  

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा