InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘वंचित आघाडी बाबासाहेबांचे राजकीय विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे’

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी उघडून रिपाइंचे राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली असली तरी त्यात रिपाइंला कुठेच स्थान नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइंचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर उमेदवार उभा केला नसता, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.