InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांचा राजीनामा

आंबेडकरी समाजाला काही वेगळे वळण मिळेल म्हणून 12 वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघात दाखल होऊन प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारलं होते. मात्र आजची भारिप केवळ सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत असल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे.

मिलिंद पखाले यांच्या राजीनाम्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत करत असल्याचा आरोप पखाले यांनीकेला आहे.

तसेच, वंचितमुळे 7 ते 8 ठिकाणी भाजपला विजय मिळण्यास मदत होईल. वंचित आघाडीच्या 99 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही मिलिंद पखाले यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply