Vande Bharat Express | वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडला धक्कादायक प्रकार! दरवाजा अचानक बंद झाला अन् रेल्वे अधिकारी…

Vande Bharat Express | टीम महाराष्ट्र देशा: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वे अधिकारी ट्रेनमध्ये चढत असताना अचानक दरवाजा बंद झाल्यानं त्याचा अपघात झाला आहे.

Railway officer Abhinash Tutade is seen trying to board the moving train

अहमदाबादहुन मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये (Vande Bharat Express) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वे अधिकारी अभिनाश तुताडे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ट्रेनमध्ये चढत असताना अचानक दरवाजा बंद होतो आणि ते खाली पडतात. अभिनाश थोडक्यात ट्रेन खाली जाण्यापासून बचावले आहे.

26 जून 2023 रोजी दुपारी 03 वाजता ही वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) अहमदाबादहून मुंबईला निघाली होती. रेल्वे अधिकारी अभिनाश यांची ही ट्रेन सुटत होती. त्यामुळे त्यांनी धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. रेल्वे चालकाने दरवाजा उघडला पण ट्रेनमध्ये चढत असताना अभिनाश यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्मवर पडले.

दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @DarseyJim या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3prSJin