Varsha Raut : पती-पत्नीची एकत्र चौकशी होणार?; संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) ताब्यात आहेत. तर आज त्यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी पार पडली आहे. त्यावेळी १० ऑगस्टपर्यंत त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यावर कोर्टाकडून संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे अजून ४ दिवस ईडीकडून राऊतांची चौकशी सुरूच राहणार आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचे अनोळखी व्यक्तीशी व्यवहारिक संबंध आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनोळखी व्यक्तीशी मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यात आली असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीने म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी 10 प्लॉट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याची माहिती ईडी तपासात समोर आली होती. त्यामुळे या संदर्भातील तपास आणि चौकशी करण्यासाठी १० तारखेपर्यंत राऊतांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने केली होती. त्यावर कोर्टाने १० तारखेपर्यंत कोठडी न देता ८ तारखेपर्यंत कोठडी दिली आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी समन्स बजावले आहे. पाच ऑगस्ट रोजी वर्षा राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? बाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे. यामुळे या प्रकरणात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची एकत्रित चौकशी होऊ शकते अशी माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, यामुळे आता संजय राऊत यांच्या आडचणीसह त्यांच्या पत्नीच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊतांच्या ईडी कारवाईमुळे शिवसेनेला देखील मोठा धक्का बसला आहे. संजय राऊतांनी एकट्याने मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार दोघांनाही घाम फोडला होता. त्यामुळे संजय राऊतांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.