Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!
मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आज त्याच्या ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रसाद यांचा जन्म ५ ऑगस्ट १९६९ रोजी बंगळुरू येथे झाला. त्याने देशासाठी सुरुवातीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रसादने २ एप्रिल १९९४ रोजी क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात त्याने नऊ षटके टाकली होती. मात्र, या सामन्यात त्याला कोणतेही यश मिळवता आले नाही.
या सामन्यानंतर तो त्याच्या संपुर्ण कारकिर्दीत देशासाठी एकूण १६१ एकदिवसीय सामने खेळला. यादरम्यान त्याने १६० डावांमध्ये ३२.३ च्या सरासरीने १९६ बळी मिळवले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये ३ वेळा ४ आणि एकदा ५ बळी घेण्याचा पराक्रम व्यंकटेशच्या नावावर आहे. एकदिवसीय फॉर्मेट व्यतिरिक्त, त्याने दोन वर्षांनंतर १९९६ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध देशासाठी कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्याच डावात त्याला ४ बळी घेण्यात यश आले होते. याशिवाय दुसऱ्या डावातही त्याने दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते.
व्यंकटेश प्रसादने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ३३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ५८ डावांत ३५.० च्या सरासरीने ९६ बळी घेण्यात यश मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये एकदाच चार आणि सात पाच बळी घेण्याचा पराक्रम प्रसादच्या नावावर आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ३३ धावांत ६ बळी अशी राहिली आहे.
पाकिस्तान विरुध्द नेहमीच ३६चा आकडा राहिला
वेंकटेश प्रसाद यांनी क्रिकेटच्या मैदानात जेव्हा जेव्हा पाकिस्तान संघाविरुध्द सामना खेळला तेव्हा त्यांची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली होती. याशिवाय त्याचे पाकिस्तानी खेळाडूंसोबतचे संबंधही खूप तणावाचे राहिले होते. १९९६ च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दरम्यान व्यंकटेश प्रसादने टीम इंडियासाठी सामन्याचे १५ वे षटक टाकले होते. त्याच्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विरोधी संघाचा कर्णधार आमेर सोहेलने शानदार चौकार मारला आणि त्यानंतर आपली बॅट दाखवत वेंकटेशची छेड काढली. मैदानात सोहेलचे हे कृत्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळी प्रसादने मौन बाळगले आणि पुढच्याच चेंडूवर विरोधी फलंदाजाला आपल्या गोलंदाजीने चोख प्रत्युत्तर दिले. प्रसादचा हा बदला क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवला जातो.
292 wickets in international cricket 😯
Here's wishing former 🇮🇳 pacer Venkatesh Prasad a very happy birthday 🎂#Cricket #CricketTwitter @venkateshprasad pic.twitter.com/gVJI1OAbsi
— Cricket.com (@weRcricket) August 5, 2022
या सामन्यात भारताने दिलेल्या २८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ निर्धारित षटकात ९ गडी गमावून २४८ धावाच करू शकला. संघासाठी या सामन्यात व्यंकटेश प्रसादने प्रशंसनीय कामगिरी करत १० षटकात ४५ धावा देत ३ बळी मिळवले होते. प्रसादने या सामन्यात विरोधी संघातील खेळाडूंमध्ये कर्णधार अमीर सोहेलसह एजाज अहमद आणि इंझमाम-उल-हक या प्रमुख खेळाडूंना बाद केले होते. टीम इंडियाने हा सामना ३९ धावांनी जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Cabinet Expansion । शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, हे कारण आलं समोर
- China vs Taiwan | मोठी बातमी : चीनने तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागली, पण त्यातील 5 जपानमध्ये पडली
- Chhagan Bhujbal । “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”; राऊतांच्या अटकेवर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
- Eknath Shinde | ‘वर्षा’वर लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची ‘नेमप्लेट’
- Ravi Rana । मोठी बातमी : रवी राणा यांची शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
Comments are closed.