InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जेव्हा सेनेचा खासदारच सांगतो राष्ट्रवादीला मत द्या, तेव्हा होतो गदारोळ

उस्मानाबादमध्ये ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. खासदार रवींद्र गायकवाड यांना एका शिवसैनिकांनी मतदान कुणाला करायचे विचारले असता, “घड्याळाला करा”, असं उत्तर गायकवाडांनी दिले. त्यामुळे संतप्त झालेला शिवसैनिक थेट खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी गायकवाड आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

एका शिवसैनिकाने खासदार रवींद्र गायकवाड यांची कॉलरही पकडली. शिवसैनिक आक्रमक होताच गायकवाड यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मतदान केंद्रावर घडली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply