InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

व्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा; विरोधकांची निवडणूक आयोगाकडे मागणी

लोकसभा निवडणुकीची येत्या गुरुवारी मतमोजणी करताना मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणी केली जावी आणि यात एका जरी मतात तफावत आढळली, तर त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदानयंत्रांमधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करून नंतरच मतमोजणी सुरू केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली.

एक्झिट पोलचे अंदाज व देशाच्या मतदानयंत्रे स्ट्राँगरूममधून अन्यत्र हलविली गेल्याच्या कथित बातम्यांवरून निर्माण झालेले शंकेचे वातावरण, यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांची सकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत रणनीतीची आखणी केली. त्यानंतर, या पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.