Vespa GTS | लोकप्रिय स्कूटर कंपनी Vespa च्या नवीन व्हेरियंटचे फिचर्स आले समोर

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय वाहन क्षेत्रात सध्या बऱ्याच प्रमाणात तेजी आहे. विविध वाहन कंपन्या आपल्या नवनवीन वाहनांना देशात लॉंच करत आहेत. अशात मग दुचाकीच्या वेगळ्या व्हेरियंटवर देखील भारतीय नागरिकांच्या नजरा असतात. दुचाकी वाहनाने यंदा भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांना गुंतवून ठेवले आहे. 1980-90 च्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या वेस्पा (Vespa) स्कुटरला कंपनी नव्या अवतारात आणणार आहे.

वेस्पा स्कुटर 4 नव्या व्हेरियंटसह बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

1) स्टैंडर्ड जीटीएस
2)जीटीएस सुपर
3)जीटीएस सुपरस्पोर्ट
4) जीटीएस सुपरटेक

या चार नव्या स्कुटरला कंपनी 2023 मध्ये लाॅंच करणार आहे. परिणामी वेस्पाच्या या स्कुटरला बाजारात मागणी येण्याची शक्यता आहे. अशात कंपनी लवकरच स्कुटरसाठी बुकिंग प्रोसेस सुरू करणार आहे.

Vespa च्या स्कुटरमधील काही खास फिचर

जीटीएस वेस्पा (Vespa GTS) स्कुटर ग्राहकांना दोन इंजिनचा पर्याय देत आहे. नविन तंत्रज्ञानाचा वापर करून एक 125 आई-जीटी इंजिन आणि दुसरे 300 एचपीई इंजिन आहे. दोन्ही इंजिनमध्ये विविध गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. सिंगल सिलेंडर युनिट, लिक्विड कूल्ड अशा गोष्टींचा समावेश आहे. कंपनीच्या मते, या गाडीला बसवण्यात आलेले इंजिन हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक सक्षम इंजिन आहेत.

नवीन डिझाईन करताना देखील वेस्पाने आपली स्वतंत्र ओळख जपण्याचे काम केल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे. फिचर आणि डिझाईन करताना ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचे सर्व मानक गाडी पुर्ण करत असल्याचे देखील कंपनीने सांगितले आहे. मिरर, मड गार्ड, फ्रंट एप्रन या गाडीची खास वैशिष्ट्ये आहेत. चालकाला आरामदायी अनुभव येण्यासाठी सीट आणि ससपेंशन जोडण्यात आले आहे.

सध्या बाजारात नवीन फिचर्स असलेल्या अनेक गाड्या येत आहेत मग अशात वेस्पाला स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या गाडीला नवीन आणि आधुनिक साहित्य वापरण्यात आले आहे. 4.3 इंचचा फुल कलर टीएफटी डिस्प्ले, 3 इंचचा एनालाॅग एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्कुटर 14 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.