रामायणातील ‘आर्य सुमंत’ भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचे निधन

मुंबई : दिग्गज अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं आज निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील अंधेरीच्या आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला.

चंद्र्शेखर यांचे नातु विशाल शेखर यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना म्हटलं की, ‘‘त्यांना अनेक दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना जुहूच्या क्रिटी केयर रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र ताप कमी झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना ही वेळ आपल्या कुटुंबांसोबत घालवायची होती. त्यामुळे घरीच त्यांच्यासाठी सर्व नर्सिंग व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आज झोपेतच आजोबां आम्हाला सोडून गेले.”

चंद्र्शेखर यांनी सहाय्यक कलाकार म्हणून करियरची सुरुवात केली होती. मात्र, आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटांत मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. 1953 मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘सुरंग’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी कवी, मस्ताना, काली टोपी, लाल रुमाल, स्ट्रीट सिंगरसारख्या अनेक चित्रपटात ते मुख्य अभिनेता म्हणून झळकले होते. त्यांनी रामायणातील ‘आर्य सुमंत’काची भूमिकादेखील साकारली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा