Vicky Koushal & Katrina Kaif | पहिल्या दिवाळी निमीत्त विकी कौशलने कतरीनाला म्हटलं ‘घरची लक्ष्मी’ अन्…; पाहा विकी – कतरीनाची दिवाळी

मुंबई: सध्या देशात सर्वत्र दिवाळी Diwali सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. दरम्यान, बॉलीवूड Bollywood सेलिब्रिटी देखील दिवाळी सेलिब्रेशन मध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. कारण सर्व बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहात्यांना शुभेच्छा देताना दिसले आहे. यामध्ये अनेक जोडप्यांची ही पहिली दिवाळी असून चाहते त्यांच्या पहिल्या दिवाळीचे फोटो बघण्यासाठी उत्साहीत होते. बॉलीवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे म्हणजेच विकी कौशल Vicky Koushal आणि कतरीना कैफ Katrina Kaif  यांनी देखील काल आपली पहिली दिवाळी साजरी केली. विकी कौशल्य आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. विकीची ही पोस्ट सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे.

विकी कौशलने Vicky Koushal केली सोशल मीडियावर दिवाळी स्पेशल पोस्ट

काल देशात सर्वत्र मोठ्या आनंदात आणि उत्साहात लक्ष्मीपूजन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील लक्ष्मीपूजन करून आपला दिवाळी सण साजरा केला. बॉलीवूडचे सगळ्यांचे लाडके कपल विकी कौशल आणि कतरीना कैफ यांनी देखील आपल्या घरी लक्ष्मीपूजन करून दिवाळीचा आनंद घेतला. विकी कौशल्य त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे लक्ष्मीपूजनाची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये दिसल्याप्रमाणे विकी आणि कतरीना साध्या पारंपारिक ड्रेस मध्ये घराच्या देवघरासमोर उभे आहे. विकीने पूजेदरम्यान पांढरा रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला असून कतरीनाही पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसली आहे.

विकी कौशल्य शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शनने सर्व चाहात्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. विकीने या फोटोला कॅप्शन दिले आहे, “लक्ष्मीपूजन घरातील लक्ष्मी सोबत पार पडले. तुम्हा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.” विकीच्या या कॅप्शन ने चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्याचबरोबर विकीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

विकी कौशल आणि कतरीना कैफ यांनी गेल्या वर्षी राजस्थानमध्ये लग्न केले होते. त्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र यांचा समावेश होता. कॉफी विथ करण या शोमध्ये कतरीनाने सांगितली होती की तिचे विकी सोबतचे नाते हे खूप वेगळे असून अनपेक्षित आहे. त्याचबरोबर याच शोमध्ये विकी कौशल म्हणाला होता की, “हे माझे नशीब होते आणि ते खरोखरच घडणार होते”. बॉलीवूडमधील या जोडप्याला दिवसेंदिवस चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.