InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सोनाली अडकली काळाच्या विळख्यात; ‘विक्की वेलिंगकर’ टीझर प्रदर्शित

- Advertisement -

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमा मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसापूर्वीच या सिनेमाचे पोस्टर्स रिलीज झाले. ज्यातील मास्क मॅनच्या पोस्टरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. त्यानंतर आता या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. अत्यंत गुढ आणि रहस्यमय अशा टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या टीझरमध्ये फक्त मास्क मॅन आणि सोनाली कुलकर्णी दिसत असल्यानं अभिनेत्री स्पृहा जोशीच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

Loading...

‘विक्की वेलिंगकर’च्या या टीझरमधून ‘मास्क मॅन’चा अधिक रुद्र आणि घाबरवणारा ‘चेहरा’ समोर येतो. सिनेमाची नायिका सोनाली कुलकर्णी गर्भगळीत अवस्थेत दिसत असल्यानं प्रेक्षकांमध्येही एक प्रकारची भीती निर्माण होते. ‘ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?’ हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटीत तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेस’, असे वाक्य सोनालीच्या तोंडी आहे. तसेच या चित्रपटामध्येही अनेक रहस्य दडलेली असतील असा कयास प्रेक्षक बांधत आहेत. सध्या सोशल मिडियावर या टीझरची जोरदार चर्चा  सुरु आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.