InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विदर्भाच्या पोरांनी शहीदांसाठी केलेली ही गोष्ट वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

नागपुर | शेष भारत विरुद्ध विदर्भ इराणी ट्राॅफी स्पर्धेत विदर्भाने शेष भारत संघावर पाचव्या दिवशी पहिल्या डावाच्या आघाडीवर शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी ही ट्राॅफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यात शेष भारताने पहिल्या डावात ३३० तर दुसऱ्या डावात ३ बाद ३७४वर आपला डाव घोषीत केला होता. विदर्भाने पहिल्या डावात ४२५ धावा करत ९५ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात विदर्भाला जिंकण्यासाठी २७९ धावांची गरज होती. परंतु १०३.१ षटकांत त्यांना ५ बाद २६९ धावांपर्यंतच मजल मारता आली. केवळ ११ धावांमुळे त्यांना सामन्यात  विजय मिळवता आला नाही. परंतु पहिल्या डावातील आघाडीमुळे त्यांच्या नावावर ही ट्राॅफी झाली.

सलग दोन वर्ष रणजी ट्राॅफी आणि इराणी ट्राॅफी जिंकणारा विदर्भ यामुळे तिसराच संघ ठरला. यापुर्वी अशी कामगिरी केवळ मुंबई आणि कर्नाटक संघालाच करता आली आहे.

“आम्ही बक्षीसाची रक्कम पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबीयांना देणार आहोत. आमच्याकडून ही एक छोटीशी मदत असेल.” असे यावेळी विदर्भाचा कर्णधार फैज फजल म्हणाला.

इराणी ट्राॅफी विजेत्या संघाला १० लाख रुपयांचे बक्षीस बीसीसीआयकडून मिळते. विदर्भाच्या संघाने सलग दोन वर्ष हे विजेतेपद जिंकताना मोठा इतिहास घडवला आहे.

शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे – प्रकाश आंबेडकर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply