Video | शतकानंतर विराट कोहली भुवनेश्वरला म्हणाला, ” अभी क्रिकेट …”

Asia Cup 2022 | नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय दिग्गज विराट कोहली याने आपले ७१ वे शतक झळकावल्यामुळे करोडो भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. शतकानंतर विराटने आपल्या या शानदार खेळीचे श्रेय पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिले. दरम्यान, शतकानंतर विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारला काहीतरी सांगितले जे खूप व्हायरल होत आहे.

मैदानावर 122 धावांची नाबाद इनिंग खेळून विराट ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना सर्व खेळाडू त्याच्याशी हस्तांदोलन करत असताना विराट भुवनेश्वर कुमारला म्हणाला, “अभी है क्रिकेट बाकी”. हे उत्तर ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने 4 षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने 19व्या षटकात 19 धावा दिल्या. यानंतर चाहते त्याच्यावर नाराज झाले होते आणि पराभवासाठी त्याला ट्रोल करत होते पण भुवनेश्वर कुमारने आता लय साधली आहे.

कोहलीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. कोहलीला तब्बल ३ वर्षे आणि ८३ डावांनंतर शतक झळकावण्यात यश आले. यापूर्वी कोहलीला संघाबाहेरील काढण्याची देखील चर्चा सुरू होती. आता कोहलीने आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, टीम इंडियाचा आशिया कपमधील प्रवास आता संपला आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना आता ११ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.