InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Video: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

सगळ्या देशाचं लक्ष आजच्या बजेटकडे (Budget 2019) लागलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारामन यांनी हे बजेट संसदेत सादर केलं. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर यावेळी त्यांनी संपूर्ण बजेटचं स्वागत केलं आहे.

LIVE : PM Shri NarendraModi's remarks on the Budget 2019-20

Geplaatst door Bharatiya Janata Party (BJP) op Vrijdag 5 juli 2019

- Advertisement -

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा आलेलं मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार, कृषी या क्षेत्रातील आव्हानाला सामोरे जात सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे.

Loading...

कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आरबीआयचं नियंत्रण राहणार. नियमितपणे कर देऊन देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे आभार आहोत. 20 रुपयांची नवी नाणी लवकर चलनात आणली जाणार आहे. या नवीन नाण्यामुळे अंध लोकांनाही नाणी ओळखता येणार आहे.

गेल्या 5 वर्षात प्रत्यक्ष करात सरकारच्या नीतीमुळे वाढ झाली. 250 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्के होता, आता या स्लॅबमध्ये 400 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांचाही समावेश करण्यात येत आहे. यामध्ये 99.3 टक्के कंपन्यांचा समावेश आहे. ई-वाहने तयार करण्याचं आपल्याला जागतिक हब करण्यावर भर देत आहोत. या वाहनांवर 12 ऐवजी 5 टक्के जीएसटी लावला जाईल इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयकरमध्ये सूट देण्यात येणार आहे., असे निर्णय अर्थसंकल्पात मोदी सरकारने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.