अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…

दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमाची ‘रिअल हिरोइन’ म्हणजेच खरी अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालची कथा आता सर्वांनाच माहित झाली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेनंतर लक्ष्मी फक्त अ‍ॅसिडची खुली विक्री बंद करण्यासाठीच लढा दिला नाही तर याच काळात ती स्वतःचं जीवन मोकळेपणानं जगायलाही शिकली. कदाचित या सगळ्यामुळेच ती आज सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या याच सर्व प्रवासावर आधारित छपाक सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज होत आहे.

लक्ष्मीच्या जीवनावर आधारित छपाकमध्ये दीपिका पदुकोण तिची व्यक्तिरेखा साकारत आहे. पण सिनेमाच्या रिलीज पूर्वीच लक्ष्मी अग्रवालचे काही सुंदर टिक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लक्ष्मी कधी डान्स करताना तर गाणी गाताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.