राज्यात ‘या’ व्हिडीओची चर्चा, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा व्हिडिओ व्हायरल

रायगड : अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. गेले ३ दिवस पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलाचे परिणाम सातत्याने दिसून येत आहेत. त्यामुळे पावसाचा हंगाम संपला तरीही अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे.

हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. मात्र असं असताना निसर्गाचं एक अनोखं दृश्य देखील यावेळी पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रभर रायगडावरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करायला गेलेल्या शिवप्रेमीनं रायगडावरील ही दृश्य कॅमेरात टिपली आहेत. सध्या व्हाटसअ‌ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. अनेकांच्या व्हाटसअ‌ॅप स्टेटसला हाच व्हिडीओ पाहयाला मिळत आहे.

तसेच काल दिवसभर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शिवभक्त रोशन गावसकर याने बनवला आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 2008 साली प्रदर्शित झालेल्या दे धक्का चित्रपटातील वाट चालावी चालावी या गीताचा वापर करण्यात आला आहे. हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा