InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Video: ‘फोटोग्राफर पाय घसरुन कोसळल्यावर राहुल गांधी मदतीसाठी धावत गेले’

फोटोग्राफर पाय घसरुन कोसळल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी मदतीसाठी धावत पुढे गेले आणि फोटोग्राफरला मदतीचा हात दिला. राहुल गांधींमधील माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ओदिशातील भुवनेश्वर विमानतळावर हा प्रसंग घडला.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला. राहुल गांधींच्या सतर्कतेचा हा व्हिडीओ एएनआयने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, राहुल गांधींवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकीय पक्षाचा मोठा नेता असताना, आजूबाजूला सुरक्षारक्षकांचं कवच असतानाही, ते सर्व न बाजूला ठेवत, राहुल गांधींनी स्वत: धावत जाऊन फोटोग्राफरला मदतीचा हात दिला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply