Vijay Hazare Trophy | इंग्लंडला मागे टाकत तामिळनाडूने लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम

बेंगळुरू : बेंगळुरू येथील चीन्नास्वामी क्रिकेट मैदानावर विजय हजारे ट्रॉफी 2022 (Vijay Hazare Trophy 2022) मध्ये तामिळनाडू (Tamilnadu) ने विक्रमांची रांग लावली आहे. यामध्ये सोमवारी झालेल्या अरुणाचल विरुद्ध सामन्यांमध्ये तामिळनाडूने 5 षटकामध्ये 2 बाद करत 507 धावा केल्या. यानंतर तामिळनाडू लिस्ट ए क्रिकेट मधील सर्वोच्च धावा करणारा संघ बनला आहे. यामध्ये एन जगदीशन (N Jagadeesan) ने 277 धावांची खेळी खेळली आहे. यामध्ये त्यांनी 15 षटकार आणि 14 चौकार लावले आहेत. त्याचबरोबर यानंतर त्याने अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहे.

तामिळनाडूने केलेली ही धावसंख्या लिस्ट ए क्रिकेट मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर होता. इंग्लंडने नेदरलँड विरोधात वनडे सामन्यांमध्ये 498 धावा केल्या होत्या. तर तामिळनाडूने इंग्लंडला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. या सामन्यानंतर तमिळनाडूचा फलंदाज जगदीशनने देखील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवले आहे.

या सामन्यामध्ये जगदीशनसोबत बी साईसुदर्शनने पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. दरम्यान, जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात बॅक टू बॅक पाचवे शतक झळकावले आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या मागील चारही सामन्यांमध्ये जगदीशनने आपल्या फलंदाजीने शतक झळकावली होती.

जगदीशनच्या आधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने वनडेमध्ये चार शतके झळकावली होती. जगदीशनने संगकारा सोबतच भारतीय संघातील पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिकल या खेळाडूंना मागे टाकले आहे. त्याचबरोबर यानंतर त्याने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या सामन्यांमध्ये जगदीशनचे त्रिशतक होऊ नाही शकले. परंतु असे असूनही तो अजून एका खास क्लबचा भाग झाला आहे. जगदीश विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.