InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार – सूत्रांची माहिती

- Advertisement -

वर्ल्ड कपमध्ये भारताला इंग्लंडनं पराभूत करून मोठा पहिला धक्का दिला. भारतानं वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नव्हता, मात्र इंग्लंडनं भारताच्या विजयी रथाला ब्रेक लावला. इंग्लंडनं दिलेल्या 337 धावांचा डोंगर भारताला पार करता आला नाही. भारतानं 31 धावांनी सामना गमावला. या सामन्यात अष्टपैलू विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यातआली होती.

इंग्लंलविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळं त्याला विश्रांती दिली. मात्र, आता विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार असल्याचे वृत्त पीटीआयनं दिले आहे. त्यामुळं आता शंकरच्या जागी मयंक अग्रवलाला संघात स्थान देण्यात येणार आहे. याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर पडला होता. धवनच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. विजय शंकरनं गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. कर्नाटकडून प्रथम श्रेणीमध्ये गाजवल्यानंतर शंकरची वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात पहिल्याच चेंडूत विकेट घेण्याचा पराक्रम विजय शंकरनं केला होता.

बीसीसीआयच्या प्रमुखांनी पीटीआयला, “विजय शंकरला सराव करताना जसप्रीत बुमराहचा चेंडू पायाला लागला होता. त्यामुळं सध्या तो खेळण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळं वर्ल्ड कपमधून तो बाहेर पडत आहे”, अशी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या – 

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील वाटूर गावात साकारणार विठ्ठलाची 51 फुटांची मूर्ती

प्रतिकूल विचारसरणी असायला पाहिजे ; रवीना टंडनचा झायराला टोला

पाकिस्तानी चाहत्यांची विराटसेनेवर टीका

प्लास्टिक बंदी विरोधातली कारवाई पुन्हा सुरु होणार

‘शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते- जितेंद्र आव्हाड

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.