Vijay Wadettiwar | “चूक झाली असेल तर कारवाई करा, पण…”; काँग्रेसमधील धूसपूसीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar | जालना : राज्याच्या राजकारणात सध्या काँग्रेस पक्षातील धूसपूसीची चर्चा रंगली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील धूसपूसीवर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलdettiत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबतही वक्तव्य केले आहे.

“चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण…”

“सत्यजीत तांबे प्रकरणावर राज्यात चर्चा सुरु आहे. मात्र, सत्यजीत तांबे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. यात सत्यता आणि वस्तुस्थिती काय आहे, यावरून लोकांत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. चूक झाली असेल तर कारवाई करावी. पण, विनाकारण, कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये”, असं मत विजय वड्डेटीवर यांनी व्यक्त केले आहे.

“थोरातांचा राजीनामा हा दुर्दैवाची बाब”

“थोरातांचा राजीनामा हा दुर्दैवाची बाब आहे. मात्र, राजीनामा मान्य करायचा की नाही, हा हायकमांडचा निर्णय आहे. याबाबत हायकमांड योग्य निर्णय घेईल”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

“काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या”

“काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपच्या गडात आम्ही विजय मिळवला आहे. अमरावती विधानपरिषदेची जागा गृहित धरली नव्हती, तरी लोकांनी निवडून दिलं. विदर्भ हा भाजपचा गड होता, पण लोकांनीच त्याला सुरुंग लावण्याचं काम केलं. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने आणि आपापसात ताळमेळ ठेऊन काम केलं पाहिजे,” असेही विजय वड्डेटीवार यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.