Vijay Wadettiwar | जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं ते राहुल गांधी करत आहे; विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं होतं ते काम राहुल गांधी करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Congress party stands with the victims of violence – Vijay Wadettiwar

हिंसाचारग्रस्त मणिपूरला राहुल गांधी भेट देत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मणिपूर दौऱ्यावरून विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. काँग्रेस पक्ष हिंसाचार पीडितांच्या पाठीशी असल्याचा विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवे होते ते राहुल गांधी करत आहेत. राहुलजी गांधी आज हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार आहेत. चुराचंदपूर आणि बिष्णुपूर जिल्ह्यातील मदत शिबिरांमध्ये ते पीडित कुटुंबांना भेटणार आहेत. काँग्रेस पक्ष हिंसाचार पीडित आणि सध्याच्या अशांततेत विस्थापित झालेल्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे.”

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी मणिपूरला जाऊन तेथील जनतेशी संवाद साधून काही मार्ग काढणार असतील, तर राहुल गांधी यांच्या मणिपूर भेटीचं आम्ही स्वागत करू.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/435JX7t

You might also like

Comments are closed.