Vijay Wadettiwar | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “अजित पवार आम्हाला निधी देत नाही म्हणून शिंदे गट वेगळा झाला होता. आता पुन्हा तेच कारण सांगून ही लोकं बाहेर पडतील का? याची जनता वाट बघत आहे. देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो दोन्हीही टेरर नेते आहेत.

या नेत्यांचं किती काळ जमतं, हे ही बघूया. खरंतर 115 लोकांना 33 टक्के वाटा आणि 35 वाल्यांनाही 33 टक्के, हे सत्तेचं समीकरण जुळवून सत्तेतून जेवढं मिळेल तेवढं सगळं त्यांना त्यांच्या घशात घालायचं आहे.”

Should the current government be called a three wheeler rickshaw or a slow train? – Vijay Wadettiwar

पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “पूर्वी तीन पक्षाच्या सरकारला आताच सरकार रिक्षा म्हणत होतं. मात्र, या रिक्षानं संकटावर मात करत अडीच वर्ष राज्य चालवलं. त्यामुळं आताच्या सरकारला तीन चाकी रिक्षा म्हणायचं की घसरगाडी म्हणायचं?

कारण या तीन चाकातील पहिलं टायर पंचर होताना दिसत आहे. सत्तेसाठी एवढा हावरटपणा महाराष्ट्राच्या जनतेनं याआधी कधीच पाहिला नव्हता.”

“लोकांमध्ये मतदान करायची इच्छा राहिलेली नाही. सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे लोकांना राज्यातील राजकारणाची लाज वाटू लागली आहे. विकासाचं आमिष दाखवून सरकार आणायचं आणि नंतर विकास काम ठप्प पाडायची. हा सर्व लज्जास्पद प्रकार जनता बघत आहेत”, असही ते (Vijay Wadettiwar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46GNUm9