Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू झाला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
OBC candidates are being treated unfairly – Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू. राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरतीमध्ये #ओबीसी उमेदवारांवर मोठा अन्याय होत असल्याची माहिती पुढे आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या शासन निर्णयानुसारच सध्याच्या सरकारने भरती करावी, अन्यथा ओबीसींच्या रोषाला पुढे जाण्याची तयारी ठेवावी.”
सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू.
राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरतीमध्ये #ओबीसी उमेदवारांवर मोठा अन्याय होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या शासन निर्णयानुसारच सध्याच्या सरकारने भरती करावी, अन्यथा ओबीसींच्या रोषाला… pic.twitter.com/DLWwYCBSKV
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 27, 2023
“गडचिरोली जिल्ह्यामध्ये 158 तलाठ्यांच्या जागांची जाहिरात निघाली होती. त्यामध्ये एकही जागा ओबीसीसाठी नव्हती. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे”, असही ते (Vijay Wadettiwar) म्हणाले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीवर सातत्याने अन्याय सुरू आहे. हा अन्याय आम्ही दूर केला होता. मात्र, सध्याचं सरकार ओबीसीवर अन्याय करत आहे आणि आम्ही ते खपवून घेणार नाही”, असही त्यांनी (Vijay Wadettiwar) ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधान
- Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात
- Devendra Fadnavis | “त्यांनी जर तोंड काळ केलं नसतं तर…”; फडणवीसांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला
- Shinde Group | ठाकरे गटाला रामराम ठोकत ‘हा’ नेता झाला शिंदे गटात सामील
- Chitra Wagh | अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !” – चित्रा वाघ
Original NEWS SOURCE – https://bit.ly/432OebR