InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सैन्याच्या कामगिरीचा राजकारणासाठी वापर नको, कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रांच्या वडीलांनी व्यक्त केली नाराजी

कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रांचे वडिल जी एल बत्रा यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमधील हवाई हल्ल्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

लष्करी कारवाईचे राजकारण करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. जी एल बत्रा म्हणाले की, लष्करी कारवाईचे राजकारण करणे मला पटत नाही, या गोष्टींबाबत लष्करी अधिकारी किंवा संरक्षण मंत्रीच भाष्य करु शकतात, अन्य नेत्यांनी याबाबत भाष्य करणे चुकीचे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमधील हवाई हल्ल्यांवरुन राजकीय पक्षांकडून आपल्या फायद्यासाठी वापर केल्याने, त्यांनी कानउघडणी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply