Vikram Gokhale | असा नट होणे नाही ; राजकीय आणि कलाविश्वातून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली
Vikram Gokhale | मुंबई : दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले (Actor Vikram Gokhale passes away). गोखले यांनी आज २६ नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale )पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल होते. दरम्यान कलाविश्वात शोककळा पसरली आहे. दरम्यान कला आणि राजकीय विश्वातून विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख – मुख्यमंत्री
आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या दैवी देणगीने मराठी तसेच हिंदी रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. आम्ही गोखले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली….
अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले – देवेंद्र फडणवीस
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना! ॐ शांति
अमोल कोल्हे यांची पोस्ट –
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!
जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता
कॅमेराला डबल लूक देईल ,
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून
पानभर संवाद बोलला जाईल
जेव्हा जेव्हा घेतलेल्या पॉज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल
जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून
पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील
जेव्हा जेव्हा ‘बिटवीन द लाईन’
संवादापेक्षा अधोरेखित होईल..
…
भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात
निर्भीड भूमिका मांडली जाईल..
तेव्हा तेव्हा विक्रमकाका…..
तुमची उणीव भासत राहील!!!
नैसर्गिक अभिनयाचा शिरोमणी हरपला… – पंकजा मुंडे
जेष्ठ अभिनेते, हरहुन्नरी कलाकार सन्माननीय विक्रम गोखले यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते नेहमी माझ्याशी मनमोकळं बोलून भरभरून शुभेच्छा द्यायचे… लवकर भेटू म्हणाले पण राहून गेले…
एक निष्ठावान कलातपस्वी हरपला – सुधिर मुनगंटीवार
विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला आहे. आपल्या सशक्त अभिनयाचा कर्तृत्ववान ठसा त्यांनी अभिनय क्षेत्रावर चौफेर उमटवला होता. ईश्वर त्यांना सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.
अक्षय कुमार –
विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दुःख झाले. भूल भुलैया, मिशन मंगल यांसारख्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. ओम शांती
भारतीय चित्रपटाने एका अभिनेत्याचे रत्न गमावले – मनोज बाजपेयी
भारतीय चित्रपटाने एका अभिनेत्याचे रत्न गमावले. अय्यारीमध्ये त्याच्यासोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आणि सेटवर त्याच्यासोबतचे काही छान क्षण शेअर केले! श्री विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले.
महत्वाच्या बातम्या :
- Neelam Gorhe | “रामदेव बाबांचं वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारं”; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संताप
- Jitendra Awhad | “ज्या माणसाने दारू पिऊन…”; जितेंद्र आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल
- Vikram Gokhale | ‘या’ चित्रपटातून विक्रम गोखले यांनी केला होता फिल्मी दुनियेत प्रवेश
- Amol Kolhe | “भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात…” ; अमोल कोल्हेंची विक्रम गोखलेंसाठी भावूक पोस्ट
- Eknath Shinde | विक्रम गोखलेंच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे नुकसान – एकनाथ शिंदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.