Vikram Gokhale | “डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत”, विक्रम गोखलेंबाबत सहकाऱ्याने दिली माहिती

Vikram Gokhale | मुंबई : बुधवारी संध्याकाळपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. हे वृत्त खोटं असून याबाबत त्यांची पत्नी वृषाली गोखले (Vrushali Gokhale) यांनी याबाबतची माहिती दिली होती. अशातच गोखले यांचे जवळचे सहकारी राजेश दामले (Rajesh Damale) यांनी मोठा खुलासा केला आहे.

गेल्या 24 तासांपासून चिंताजनक आहे, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, पण उपचारांना त्यांची तब्येत हवी तशी साथ देत नाही, खूप कॉम्पिलिकेशन्स आहे, डॉक्टरांनी फक्त आम्ही प्रयत्न करतोय एवढंच सांगितलं आहे, या शिवाय काहीही सांगितलं नाही, त्याचबरोबर डॉक्टरांनी माहिती दिली आहे कि, विक्रम गोखले क्रिटिकल आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत खूप कोंपलिकेशन आहेत, त्यांचं शरीर उपचारांना म्हणावं तसा प्रतिसाद देत नाहीय, त्याचबरोबर डॉक्टर यांनी आम्ही प्रयत्न करतो आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील, असं वृषाली यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असं देखील त्या म्हणाल्या.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांनी प्रभावी कामगिरी केली. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘निकम्मा’ (2022) होता, ज्यात अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी सह-अभिनेत्री होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.