Vikram Gokhale | दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल

पुणे: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे नाव डोळ्यासमोर येतात त्यांनी केलेले बॉलीवूडमधील अगणित पात्र आपल्या डोळ्यासमोर येतात. दिग्गज अभिनेते विक्रम गोखले गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. विक्रम गोखले त्यांच्या पत्नी सोबत राहतात. मात्र अद्यापही विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरूच आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. विक्रम गोखले यांना काय झाले किंवा ते कोणत्या आजाराने त्रस्त आहेत याबाबत अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही.

विक्रम गोखले यांनी संजय लीला भन्सालीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी बॉलीवूड मधील सुपरहिट भुलभुलय्या, दिल से, दे दनादन, हिचकी, मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता. विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये ही भरपूर काम केले आहेत.

1989 ते 1991 या काळामध्ये विक्रम गोखले यांचा प्रसिद्ध शो ‘उडान’ चांगलाच गाजरा होता. त्यामध्ये शेखर कपूर मुख्य भूमिकेत होते. तर या शोमध्ये कविता चौधरी यांनी त्यांच्या मुलीची भूमिका केली होती. या शोचे दिग्दर्शन आणि लेखन कविता चौधरी यांनीच केले होते. ही कथा एका महिलेची आयपीएस अधिकारी बनण्याची होती जी प्रतिकूल परिस्थितीशी लढून तिचे स्वप्न साकार करते.

विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील गाजलेले नाव आहे. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर त्यांची पणजी दुर्गाबाई कामात देखील भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले यांनी भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली महिला बालकामगार म्हणून काम केले होते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.