Vikram Gokhale | ‘या’ चित्रपटातून विक्रम गोखले यांनी केला होता फिल्मी दुनियेत प्रवेश

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ही मिळत होती. अशा परिस्थितीत बुधवार संध्याकाळपासून अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. पण नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आपले अखेरचे श्वास मोजले.

या’ चित्रपटातून विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला होता फिल्मी दुनियेत प्रवेश

दिग्गज अभिनेते विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय चंद्रकांत गोखले यांचे सुपुत्र होते. ते चित्रपटांसोबत टीव्हीवर आणि रंगमंचावर देखील सक्रिय होते. मराठी रंगभूमीवर साकारलेल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांची विशेष ओळख आहे. 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटांमध्ये त्यांनी बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अभिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

अभिनेते विक्रम गोखले यांनी अग्निपथ, खुदा गवाह, हम दिल दे चुके सनम, दे दना दन, ये रास्ते प्यार के, मिशन मंगल, दिल से, हिचकी आणि भुलभुलैया या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका आजही अजरामर आहेत. याचबरोबर विक्रम गोखले यांनी बॉलीवूडमध्ये अगणित भूमिका केले आहे. त्यांचे नाव समोर येताच त्यांचे चित्रपटातील पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. विक्रम गोखले नेहमी म्हणायचे की,” मला आमच्या मैत्रीचा खूप अभिमान आहे. आम्ही गेल्या 55 वर्षापासून मित्र आहोत. मला त्यांचे वागणे खूप आवडते. मी अजूनही आठवड्यातून एकदा त्यांचा चित्रपट पाहतो आणि गेले अनेक वर्ष मी हे असं करत आलेलो आहे.”

विक्रम गोखले यांनी 1971 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये आपला उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यांना 2010 मध्ये ‘अनुमती’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्याचबरोबर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहे.

विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात चार वाजता ठेवण्यात येणार आहे. सहा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.