Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, पुढील 48 तास महत्वाचे

Vikram Gokhale | मुंबई : बुधवारी संध्याकाळपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. हे वृत्त खोटं असून याबाबत त्यांची पत्नी वृषाली गोखले (Vrushali Gokhale) यांनी स्पष्ट केलं होतं. अशातच आता गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असून ते डोळे उघडत आहेत. तसेच, हात-पाय देखील हलवत आहेत. त्यामुळे, पुढील 48 तासांत त्यांचं व्हेंटिलेटर सपोर्ट निघण्याची शक्यता आहे. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे. अशी माहिती दीनानाथ रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.

Gokhale health update Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, पुढील 48 तास महत्वाचे
Vikram Gokhale health update

गेल्या 24 तासांपासून चिंताजनक आहे, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, पण उपचारांना त्यांची तब्येत हवी तशी साथ देत नाही, खूप कॉम्पिलिकेशन्स आहे, डॉक्टरांनी फक्त आम्ही प्रयत्न करतोय एवढंच सांगितलं आहे, या शिवाय काहीही सांगितलं नाही, त्याचबरोबर डॉक्टरांनी माहिती दिली आहे कि, विक्रम गोखले क्रिटिकल आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत खूप कोंपलिकेशन आहेत, त्यांचं शरीर उपचारांना म्हणावं तसा प्रतिसाद देत नाहीय, त्याचबरोबर डॉक्टर यांनी आम्ही प्रयत्न करतो आहे, असी माहिती काल गोखलेंच्या जवळच्या सहकार्याने दिली होती.

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांनी प्रभावी कामगिरी केली. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘निकम्मा’ (2022) होता, ज्यात अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी सह-अभिनेत्री होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.