Vikram Gokhale | ‘हा’ ठरला विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट
Vikram Gokhale | मुंबई : दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले (Actor Vikram Gokhale passes away). गोखले यांनी आज २६ नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale )पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल होते. दरम्यान कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
दिग्गज अभिनेते विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय चंद्रकांत गोखले यांचे सुपुत्र होते. ते चित्रपटांसोबत टीव्हीवर आणि रंगमंचावर देखील सक्रिय होते. मराठी रंगभूमीवर साकारलेल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांची विशेष ओळख आहे. 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटांमध्ये त्यांनी बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अभिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
अभिनेते विक्रम गोखले यांनी अग्निपथ, खुदा गवाह, हम दिल दे चुके सनम, दे दना दन, ये रास्ते प्यार के, मिशन मंगल, दिल से, हिचकी आणि भुलभुलैया या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका आजही अजरामर आहेत. याचबरोबर विक्रम गोखले यांनी बॉलीवूडमध्ये अगणित भूमिका केले आहे. त्यांचे नाव समोर येताच त्यांचे चित्रपटातील पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला गोदावरी चित्रपट गोखलेंचा अंतिम चित्रपट होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी कलाकृतीची दखल घ्यायला लावणाऱ्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. नुकताचा हा समारंभ संपन्न झाला असून जियो स्टुडिओजने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. गोदावरी’च्या या ट्रेलरमध्ये एका सामान्य कुटुंबाची गोष्ट आपल्यासमोर उलगाडतान दिसत आहे.
विक्रम गोखले यांनी शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेतून ते अधिक प्रसिद्ध झाले. त्यांनी एका रागीट, पुराणमतवादी आणि कडक वडिलांची भूमिका साकारली जी अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. याशिवाय तुम बिन या चित्रपटातील विक्रम गोखले यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भूल भुलैया, हिचकी, निकम्मा, अग्निपथ आणि मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडला.
महत्वाच्या बातम्या :
- Vikram Gokhale | असा नट होणे नाही ; राजकीय आणि कलाविश्वातून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली
- Devendra Fadanvis | “अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले”; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली
- Neelam Gorhe | “रामदेव बाबांचं वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारं”; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संताप
- Jitendra Awhad | “ज्या माणसाने दारू पिऊन…”; जितेंद्र आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल
- Vikram Gokhale | ‘या’ चित्रपटातून विक्रम गोखले यांनी केला होता फिल्मी दुनियेत प्रवेश
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.