Vikram Thackeray | “उद्या ४ वाजता मी…”, देवेंद्र भुयार यांच्या ‘त्या’ धमकीला विक्रम ठाकरेंचं आव्हान

Vikram Thackeray | अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्तांमध्ये धक्काबुकी झाली. यावरुन राष्ट्रवादी (NCP) नेते देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी संताप व्यक्त करत सज्जड दम भरला होता. भुयार यांच्या या धमकीला आता काँग्रेस (Congress) नेते विक्रम ठाकरे (Vikram Thackeray) यांना आव्हान दिलं आहे.

यादरम्यान, मी आज ४ वाजता केदार चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ येईल, मला जुना देवेंद्र भुयार काय आहे ते दाखवं, असं विक्रम ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी देवेंद्र भुयार यांनी स्वतः गाडी जाळून स्वतःवर गोळीबार करण्याचा बनावाचा प्रयत्न त्यांनी केला होता, असं देखी विक्रम ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या नंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही ध्यानात ठेवा, जुना देवेंद्र भुयार अंगात आणू नका, असा थेट दमच भुयार यांनी दिला होता.

यावेळी, मुंबईच्या ठाकरेंची दहशत आजही आहे, कालही होती आणि उद्या सुद्धा आहे. तुमची ही दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागायचे नाही, देवेंद्र भुयारच्या नादाला तर लागूच नका, असा थेट इशारा देवेंद्र भुयार यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.