Vinayak Nimhan । माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Vinayak Nimhan । पुणे : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद घटना समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा सनी निम्हण (माजी नगरसेवक) आणि दोन मुली असा परिवार आहे. निम्हण यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत.
निम्हण हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा ते कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदारकी भूषविली होती. निम्हण हे राजकारणामधील एक बडे प्रस्थ होते. सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करण्याची त्यांची खुबी होती.
निम्हण यानी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करून आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आमदारकी पर्यंत पोहोचले होते. विनायक निम्हण हे कोथरूड मतदारसंघातून दोन वेळेस (१९९९ ते २००९) शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यानी नारायण राणे यांच्या बरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश करुन शिवाजीनगर मतदार संघामध्ये (२००९ ते १०१४) काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निडून आले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Shambhuraj Desai । “…तर यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे डॉक्टर शिंदे साहेब”; शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Rohit Pawar । “अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…”, रोहित पवारांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
- Aditya Thackeray | खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये भांडण; आदित्य ठाकरेंचा टोला
- Bachhu Kadu । “ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही”; बच्चू कडूंचा रवी राणांवर पलटवार
- Nilesh Lanke । “राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचेच, कोण होणार ते…”; निलेश लंकेंचं मोठं वक्तव्यं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.