Vinayak Raut | “आम्ही दिलेली नावं घेण्याचा प्रयत्न गद्दार पार्टीने केला तरी…”, विनायक राऊत कडाडले

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. यानंतर आयोगाने एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाला एक दिवसांची मुदत देत नवीन ३ नावं आणि चिन्हं नोंदवण्यास सांगितली होत. उद्धव ठाकरेंनी नोंदवलेल्या ३ चिन्हांपैकी २ चिन्हांवर एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे. यावरुनच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी घणाघात केला आहे.

आम्ही दिलेल्या नावांवर अथवा चिन्हांवर दावा केला तरी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसला जाणार नाही आणि खोक्यांनी तो विकतही घेता येणार नाही, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवला आहे. या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाकडून रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप यामधून केला आहे. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करता निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवण्याचा निर्णय घेतला, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.