Vinayak Raut | “ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना…” ; विनायक राऊतांचे प्रतापराव जाधवांना प्रत्युत्तर 

Vinayak Raut | मुंबई : खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील होतील, असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला होता. त्यावर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सर्व पिवळे दिसते. त्याच पद्धतीने निष्ठेला विष्ठेची जोड देणाऱ्यांना, आपण गद्दारी केली तशी इतरही करतील असं वाटतं,” असा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी प्रतापराव जाधवांवर केला आहे.

यापूर्वी खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल, असा दावा खासदार जाधव यांनी केला.

घरातच फूट पडल्याचे चित्र- 

खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे उद्धव ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे घरातच फूट पडल्याचे चित्र आहे.  याबाबत, गजानन कीर्तिकर यांची घरी समजूत काढली होती का?, असा सवाल अमोल कीर्तीकर यांना करण्यात आला होता. याबाबत त्यांनी उत्तर दिलं होत.

गजानन कीर्तिकर हे माझे वडील आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेसोबतच राहणार आहे, असं अमोल कीर्तीकर म्हणाले होते. तसेच पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात काम करणार आहे. मागील दोन दिवसांमध्ये शिवसैनिकांचं प्रेम मिळत आहे. फोन करून लोकं सोबत असल्याचे सांगत आहे. त्यांच्या विश्वासाला तडा देणार नाही, असं देखील ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.