Vinayak Raut | “देवेंद्र फडणवीस भाजपची रंग बदलणारी राजकीय औलाद” ; विनायक राऊतांची खोचक टीका

Vinayak Raut | मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपची रंग बदलणारी राजकीय औलाद असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरुन विनायक राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. विरोधी पक्षात असताना शेतकरी वीज बिलावर घेतलेली भूमिका सत्तेत आल्यावर बदलली, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, आमचे सरकार असताना शेतकऱ्यांनी वीज माफी व्हावी, कृषी पंपाचे बिल वसूल करु नका, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता सत्तेवर आल्यावर मात्र शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करावेच लागेल, अन्यथा पर्याय नाही. अशा पद्धतीची जी भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. ही भाजपची रंग बदलणारी औलाद आहे. यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे. “विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. हा यू टर्न आता चालणार नाही”, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.