Vinayak Raut | “फडणवीस हे रंग बदलणारी राजकीय औलाद”; विनायक राऊतांचा हल्लाबोल
Vinayak Raut | बुलढाणा : शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे उद्या मोठा शेतकरी मेळावा होत आहे. या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी विनायक राऊत आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर टीका केलीय.
सत्तेत असताना वीज बिलाची माफी करायला पाहिजे, असे कोकलणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis} आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करावच लागेल, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूपच संतापले आहेत. भाजपाची ही रंग बदलणारी औलाद आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे.
विनायक राऊत म्हणाले, “विजेच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी खरे रूप दाखविले असून बिल भरावेच लागेल असे म्हटले. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच फडणवीस वीज बिल माफ करा म्हणत होते. उद्याच्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष दिसून येईल.”
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनाला कुणाचा बळी देणार काय माहित? – अजित पवार
- Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – चंद्रशेखर बावनकुळे
- Rupali Thombare | “अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली…”; रामदेव बाबांच्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या
- NCP on Santosh Bangar | अरेरावी करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय कसे वेसण घालणार? ; राष्ट्रवादीचा सवाल
- IND vs NZ | डब्ल्यू मॅचमध्ये उमरान मलिकने केला कमाल, घेतली ‘या’ खेळाडूंची विकेट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.