Vinayak Raut | बच्चू कडू, रवी राणा वादावरून ठाकरे गटाचा सरकारवर निशाणा

Vinayak Raut | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूप गरम झालं आहे. त्यामध्ये आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे.गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा एक तारखेला सात ते आठ आमदार घेऊन वेगळा निर्णय घेऊ, असं कडू म्हणाले आहेत. अशातच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादामध्ये आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उडी घेतली आहे.

काय म्हणाले विनायक राऊत (Vinayak Raut)

आज बच्चू कडू आणि रवी राणा हे भांडत आहेत. तर उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटात सर्वच स्वार्थासाठी गेले होते. मात्र आता त्यांचा तिथे अपेक्षाभंग झाला आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच, रवी राणा यांनी पुरावे न दिल्यास एक तारखेला आम्ही सात ते आठ आमदार वेगळा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाने भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच्या मागे दहा ते बारा आमदार उभे करणारे फडणवीस हेच आहेत असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.