शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान – विनायक राऊत

राज्यसभेतील शिवसेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलल्याचं माझ्या कानावर आलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान भाजप करत आहे. ही दुर्बुद्धी भाजपाला सुचलेली आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे.

लोकसभेतली बैठक व्यवस्था ज्यावेळी बदलेल त्यावेळी आम्ही ती स्वीकारू, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा NDA च्या बैठकीवर बहिष्कार नाही. भाजपनेच आम्हाला या बैठकीचं आमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत आम्हाला अधिकृत आमंत्रण आहे त्याला आम्ही जाणार आहोत, असेही राऊत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.