फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणेदेणे नाही, विनायक राऊतांचा टोला

मुंबई : पुण्यात भाजप कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘यापूर्वी आपल्यासोबत असलेले आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जे रोज उठून सावरकरांचा अपमान करतात. अरे निर्लज्जांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे सावरकरांचं नाव घेत होते’ असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते.

भारतीय जनता पक्षाने महापालिका इमारतीशेजारी नवे कार्यालय उभारले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

शिवसेनेचे जे दोन खासदार निलंबित झालेले आहेत, त्यातील अनिल देसाई हे अद्याप दिल्लीत गेलेले नाहीत. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांबद्दल एक चकार शब्द काढला नाही उलट सिपीएमचे खासदार जे कोणी बोलले आहेत, त्यांच्याविरोधात प्रियंका चतुर्वेदींनी आवाज उठवला आणि आम्ही सगळ्यांनीच त्याचा धिक्कार केला. तरीही देवेंद्र फडणवीस यांचं रडगाणे सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा