क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचा शुभारंभ

विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्यावतीने पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. आज सकाळी शिवाजी पार्क येथे मल्लखांब स्पर्धेचा शुभारंभ क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार भाई गिरकर, अभिनेते नसरुद्दीन शहा, विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक व प्रमुख कार्यवाह उदय देशपांडे आदी उपस्थित होते.

विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेमध्ये जगभरातील १५ देशांमधून १५० खेळाडू सहभागी झाले आहेत. मल्लखांब या प्राचिन पारंपरिक भारतीय व्यायाम प्रकाराच्या प्रसारासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या १० ज्येष्ठ कर्तृत्ववान मल्लखांब धुरिणांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

तावडे म्हणाले, मल्लखांब हा मातीतील खेळ आहे. मल्लखांब या खेळामुळे शारिरीक लवचिकता, शारिरीक संतुलन व मानसिक संतुलनही राखले जाते. त्यामुळे मल्लखांबमध्ये मानसिक संतुलनाला प्राधान्य देण्यात येते. आजच्या युवा पिढीला या मानसिक संतुलनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मातीतल्या भारतीय खेळातूनही संतुलन साधण्याची कला देणारा हा खेळ नक्कीच महत्त्वाचा ठरतो. आजच्या या युवा पिढीने आपला वेळ मैदानावरील खेळ मल्लखांबसाठी दिल्यास त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. यावेळी उपस्थित खेळाडूंनी मल्लखांब या खेळाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.

Loading...

कोण आहेत राज ठाकरे?; सहगल यांनी राज ठाकरेंना झापलं

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.