Vinod Tawde | “जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक…”; आव्हाडांच्या वक्तव्यावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Vinod Tawde | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखानावर केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आक्षेप व्यक्त करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.

“शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते”, असे सांगत असताना जितेंद्र आव्हाड यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावेड यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला दिला. “विनोद तावडे यांनी अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार असल्याचे सांगितले होते.” या वक्तव्याचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य (Jitendra Awhad Statement)

“मला एक दिवस विनोद तावडे विधानसभेत म्हणाले, आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातून काढणार. मग शिवाजी महाराज गोट्या खेळताना दाखविणार का? समोर औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. त्यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवितात हे जगासमोर येते. १६६९ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा खजिन्याचे टाळे उघडा, हे सांगणारे शिवाजी महाराज जगातले पहिले राजे होते.”, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथील सभेत केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विनोद तावडेंचं प्रत्युत्तर (Vinod Tawde Replied to Jitendra Awhad)

“मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं, हा इतिहास काढणार. ‘अकबर द ग्रेट’ ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार”, असे विनोद तावडे ( Vinod Tawde ) म्हणाले आहेत.

“मला आव्हाडांचे लॉजिक समजत नाही” – Vinod Tawde

“मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही. शाहिस्ते खान, औरंगजेब शिकवला म्हणजे महाराजांचे शौर्य कळते का? त्यांना असं म्हणायचं आहे का, कसाब आला म्हणून शहीद तुकारम ओंबळे, करकरे यांचे शौर्य दिसले. ते शूर होतेच, त्यासाठी कसाबने येण्याची गरज नव्हती.”, अशी टीका विनोद तावडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.