Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Vinod Tawde | मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांच्या नावांची चर्चा झाली. त्यानंतर आता भाजप नेते विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आता जोरदार रंगली आहे. या चर्चेवर आता विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

“I would love to work in central politics”

“राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी स्वारस्य नाही, मी केंद्रीय राजकारणात बरंच काही शिकायला मिळतंय, त्यामुळे मी तिकडेच खूश आहे. मी केंद्राच्या राजकारणात काम करणार”, असे म्हणत ‘भावी मुख्यमंत्र्यांच्या’ चर्चेवर पडदा टाकला आहे.  ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत तावडेंनी हे वक्तव्य केलं आहे.

“मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

2019 सालच्या निवडणुकीत विनोद तावडे यांचे तिकीट देवेंद्र फडणवीस यांनी कापल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली आणि केंद्रातल्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले, पण अधूनमधून ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा असतात.

Vinod Tawade talk about State Political

देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करुन विनोद तावडे महाराष्ट्राची धुरा सांभाळणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात. त्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर विनोद तावडे म्हणाले की, ‘या गोष्टीमध्ये आजिबात तथ्य नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मला महाराष्ट्रात येण्यास रस नाही. मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल. केंद्राच्या राजकारणात शिकायला खूप मिळतंय. पण राज्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन’, असे विनोद तावडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.