InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर विनोद तावडेंनी केला खुलासा

- Advertisement -

भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात असंतोष असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि १२ डिसेंबरला आपण निर्णय सांगू असं पंकजा म्हणाल्या. त्यानंतर भाजपानं सोमवारी खुलासा केला होता.

मात्र, चर्चा सुरूच असल्यानं भाजपाचे नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे दरवर्षी अशी पोस्ट टाकतात. पण, यावेळी त्यांच्या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

Loading...

विनोद तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे भाजपातच आहेत. असा कोणताही निर्णय त्या घेणार नाहीत. अशी पोस्ट त्या दरवर्षी करतात. मात्र, आजच्या राजकीय वातावरणात त्यांच्या पोस्टचा विरोधकांकडून वेगळा अर्थ लावण्यात आला. त्यामुळे त्या व्यथित आहेत,” अशी माहिती तावडे यांनी दिली.

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.