InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

नाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा जाळला पुतळा

- Advertisement -

बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वादाने शनिवारी हिंसक वळण घेतले. उदयनराजेंवर टीका केल्याने त्यांच्या समर्थकांनी पोवईनाका येथे रामराजेंचा पुतळा जाळून निषेध केला.

नीरा देवघर धरणातील पाणीकारण तापतच चालले असून उदयनराजे- निंबाळकर हे एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहे.

- Advertisement -

‘कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करीत आहेत,’ अशी टीका रामराजे यांनी काल केली होती.

मात्र, ही टीका सहन न झाल्याने उदयनराजे समर्थक आणि राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी साताऱा शहरातील पोवईनाका येथे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.

राजे प्रतिष्ठानचे नितीन शिंदे, संतोष घाडगे यांनी हा प्रकार केला. दरम्यान, नितीन शिंदे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.